Saturday, August 15, 2020

माझा देश, माझा अभिमान


देशात सर्वकाही परफेक्ट 

असेलच असं नाही

पण देश म्हणजे मी 

अण् देशाशिवाय मी नाही 


वडीलोपार्जीत संपत्ती स्वातंत्र्याची

ऊधळायची की वाढवायची 

देशाला अभिमान वाटेल अशी

प्रत्येक पीढी घडवायची


घराला जपतोच ना

मग देशालाही जपू आपण, 

प्राणांची आहुती नको

मागतो फक्त माणुसपण


लढतात जे जातींवरुन

त्यांना त्यांच लढू द्या...

आपण त्यात पडता,

आपला देश घडवु या


माझा देश, माझा जवान, 

माझा किसान, माझा अभिमान

पाईक देशाचा कर्तव्य पारायन

करतो आपला  देश महान


बंद नको, नको संप

नकोच नुसते आंदोलन

आमच्या गरजा आम्ही भागवू

देशा तारेल स्वावलंबन 


पुन्हा देशा आहुती देवु

देश करू सोने कि चिडीया

स्वातंत्र्याची घेऊ शपथ

ब्रीद आपले मेक ईन इंडिया


~ दत्ता चत्तर 

You choose to be prime by opting for prime membership here

Saturday, August 1, 2020

शेत’सार’



पुढे चालते पाभार

धार पडते चाड्यात

धनी चाले भरभर

तोच हुशार कामात


मुग सोडी मालकीन

मागे सुधारते चुक

जपे प्रत्येक काकरी

भागे समस्तांची भुक


पहाटेच हाकी औत

त्याच्या हाती असे यश 

दुपारीच्या प्रहरात

घेई मोकळा तो श्वास


पक्षी घालीती घिरट्या

दाणं धरता कणीस

शेत राखता शाबूत 

बैल हसे दावणीस


जोपासले दिनराती

पिक माझे ते लेकरू

जरा नजर हटता

ऊसा तोडी वाटसरू


शेतकरी राजा माझा

रोज काढीसे ऊतारा

कधी कर्जाचा रे बोजा

सात बारा करी कोरा


जल बरसे श्रावण

देव झालासे पावण

गळ्या बैलांच्या कासरा

करी दुष्काळी आसरा


~ दत्ता चत्तर

Sunday, July 26, 2020

कधी पाहिलंय का..?





तिच्या एका कटाक्षाने
क्षणभर थांबलेलं ह्रदय
एका स्पर्शाने रोखलेला
दोघांचा एक श्वास... 
'वेळ पुढे सरकूच नये'
अशी मनोमन आस... 
तुम्हाला कधी लागलीये का..? 

चेहर्‍यावरती आलेली 
तिची ती सुंदर बट... 
नजर खिळवून ठेवणारे
तिचे ते सुंदर ओठ... 
अन् मातीत रिंगण करणारं 
तिच्या पायाचं पहिलं बोट... 
तुम्ही कधी पाहिलंय का..? 

नजरेसमोर खेळणारी 
तिची ती सुंदर काया... 
अन् लहान लहान कृतीतून
तिने लावलेली माया... 
तिचं स्मित पाहताच 
मनाला झालेला हर्ष... 
अन् तिच्या हातांचा पहिला
नकळत झालेला स्पर्श... 
तुम्हाला आठवतोय का..? 

तुमच्या दिशेने वळलेली 
तिची ती नाजुक पाऊले
'खुप काही सांगायचंय' 
म्हणणारे बोलके डोळे... 
'पण समोर आल्यावर 
काहीच सुचत नाही... '  
कारण मन निरागस भोळे... 
तुम्ही कधी पाहिलेय का..? 

विरहाने व्याकुळलेलं 
तुमचं सैरभैर मन... 
वर्षाएवढा भासणारा 
प्रत्येक अस्वस्थ क्षण... 
अन् पुन्हा पुन्हा जगावसं असं
पुस्तकात लपवलेलं, 
तिच्या आठवणींचं पान... 
तुम्ही कधी पाहिलंय का..? 

- दत्ता चत्तर

Featured Post

माझा देश, माझा अभिमान

Popular Posts