Sunday, July 26, 2020

कधी पाहिलंय का..?





तिच्या एका कटाक्षाने
क्षणभर थांबलेलं ह्रदय
एका स्पर्शाने रोखलेला
दोघांचा एक श्वास... 
'वेळ पुढे सरकूच नये'
अशी मनोमन आस... 
तुम्हाला कधी लागलीये का..? 

चेहर्‍यावरती आलेली 
तिची ती सुंदर बट... 
नजर खिळवून ठेवणारे
तिचे ते सुंदर ओठ... 
अन् मातीत रिंगण करणारं 
तिच्या पायाचं पहिलं बोट... 
तुम्ही कधी पाहिलंय का..? 

नजरेसमोर खेळणारी 
तिची ती सुंदर काया... 
अन् लहान लहान कृतीतून
तिने लावलेली माया... 
तिचं स्मित पाहताच 
मनाला झालेला हर्ष... 
अन् तिच्या हातांचा पहिला
नकळत झालेला स्पर्श... 
तुम्हाला आठवतोय का..? 

तुमच्या दिशेने वळलेली 
तिची ती नाजुक पाऊले
'खुप काही सांगायचंय' 
म्हणणारे बोलके डोळे... 
'पण समोर आल्यावर 
काहीच सुचत नाही... '  
कारण मन निरागस भोळे... 
तुम्ही कधी पाहिलेय का..? 

विरहाने व्याकुळलेलं 
तुमचं सैरभैर मन... 
वर्षाएवढा भासणारा 
प्रत्येक अस्वस्थ क्षण... 
अन् पुन्हा पुन्हा जगावसं असं
पुस्तकात लपवलेलं, 
तिच्या आठवणींचं पान... 
तुम्ही कधी पाहिलंय का..? 

- दत्ता चत्तर

No comments:

Featured Post

नाव

Popular Posts