जीर्णसा सदरा, तुटलेली चप्पल
धोतर ठिगळानी बेतलेले
तोंडात तंबाखू, डोक्यात टोपी
आज रस्ता चुकलेले
वर्गात घुसले, जमीनीवरच बसले
म्हणून सगळेच हसलेले
बापावर हसले, अपमानीत केले
पाहून मन हिरमुसलेले
जिद्दीने लढलो, शर्थही केली
कष्टाचे फळ मिळलेले
बाप गेला, पण नाव राहिले
शाळेवर कोरलेले
~ Datta Chattar
काव्यार्त
स्वागत आहे तुमचं माझ्या कवितेच्या जगात. सापडेल सुंदर जग गुंफलेल तिच्या प्रत्येक धाग्यात...दत्तात्रय चत्तर.
Friday, July 5, 2024
नाव
Saturday, August 15, 2020
माझा देश, माझा अभिमान
देशात सर्वकाही परफेक्ट
असेलच असं नाही
पण देश म्हणजे मी
अण् देशाशिवाय मी नाही
वडीलोपार्जीत संपत्ती स्वातंत्र्याची
ऊधळायची की वाढवायची
देशाला अभिमान वाटेल अशी
प्रत्येक पीढी घडवायची
घराला जपतोच ना
मग देशालाही जपू आपण,
प्राणांची आहुती नको
मागतो फक्त माणुसपण
लढतात जे जातींवरुन
त्यांना त्यांच लढू द्या...
आपण त्यात न पडता,
आपला देश घडवु या
माझा देश, माझा जवान,
माझा किसान, माझा अभिमान
पाईक देशाचा कर्तव्य पारायन
करतो आपला देश महान
बंद नको, नको संप
नकोच नुसते आंदोलन
आमच्या गरजा आम्ही भागवू
देशा तारेल स्वावलंबन
पुन्हा देशा आहुती देवु
देश करू सोने कि चिडीया
स्वातंत्र्याची घेऊ शपथ
ब्रीद आपले मेक ईन इंडिया
~ दत्ता चत्तर
Sunday, August 9, 2020
बंधारा

काळ्या ढगाची प्रतिमा
खाली दिसते पाण्यात
काळे कर्म तयासम
सदा बोचते मनात
शालु नेसून हिरवा
सजल्यात कपारीही
पहुडल्या स्वत:लाच
न्याहाळीत जलाशयी
जसा भासतो बंधारा
हिमालयी शुद्ध जल
गोड माणुस भासतो
मन जयाचे निर्मळ
अती दुर्लभ बंधारा
पाणी जयाचे निर्मळ
तसा माणुसही भासे
शुद्ध मनाचा दुर्मिळ
पाणी गढूळ गढूळ
बांध घालून रोखलं
तसं शंकांचं काहूर
माझ्या मनात दाटलं
ऊतू गेलाया बंधारा
पारदर्शक ते नीर
होई शांत तसे मन
जाता चिंतेचा तो पूर
~ दत्ता चत्तर
Saturday, August 1, 2020
शेत’सार’
पुढे चालते पाभार
धार पडते चाड्यात
धनी चाले भरभर
तोच हुशार कामात
मुग सोडी मालकीन
मागे सुधारते चुक
जपे प्रत्येक काकरी
भागे समस्तांची भुक
पहाटेच हाकी औत
त्याच्या हाती असे यश
दुपारीच्या प्रहरात
घेई मोकळा तो श्वास
पक्षी घालीती घिरट्या
दाणं धरता कणीस
शेत राखता शाबूत
बैल हसे दावणीस
जोपासले दिनराती
पिक माझे ते लेकरू
जरा नजर हटता
ऊसा तोडी वाटसरू
शेतकरी राजा माझा
रोज काढीसे ऊतारा
कधी कर्जाचा रे बोजा
सात बारा करी कोरा
जल बरसे श्रावण
देव झालासे पावण
गळ्या बैलांच्या कासरा
करी दुष्काळी आसरा
~ दत्ता चत्तर
Sunday, July 26, 2020
कधी पाहिलंय का..?
Featured Post
Popular Posts
-
जीर्णसा सदरा , तुटलेली चप्पल धोतर ठिगळानी बेतलेले तोंडात तंबाखू , डोक्यात टोपी आज रस्ता चुकलेले वर्गात घुसले , जमीनीवरच बसले ...
-
तिच्या एका कटाक्षाने क्षणभर थांबलेलं ह्रदय एका स्पर्शाने रोखलेला दोघांचा एक श्वास ... ' वेळ पुढे सरकूच न...
-
पुढे चालते पाभार धार पडते चाड्यात धनी चाले भरभर तोच हुशार कामात मुग सोडी मालकीन मागे सुधारते चुक जपे प्रत्येक काकरी भागे समस्...

