Friday, July 5, 2024

नाव


जीर्णसा सदरा, तुटलेली चप्पल 

धोतर ठिगळानी  बेतलेले


तोंडात तंबाखू, डोक्यात टोपी

आज रस्ता चुकलेले


वर्गात घुसले, जमीनीवरच बसले 

म्हणून सगळेच हसलेले


बापावर हसले, अपमानीत केले

पाहून मन हिरमुसलेले


जिद्दीने लढलो, शर्थही केली

कष्टाचे फळ मिळलेले


बाप गेला, पण नाव राहिले

शाळेवर  कोरलेले


~ Datta Chattar


No comments:

Featured Post

नाव

Popular Posts