Saturday, March 31, 2018

पत्नीला एका कारणाची गरज आहे

सकाळी नेहमी प्रमाणे उठलो , 😴😴
पाहिले तर शेजारी बायको तापाने फणफणलेली ....

कपाळावर झंडू बाम लाऊन दिला ,
खाली जाऊन दूध आणले , सुंठ,गवतीचहा तुलसी घालून गरम गरम चहा केला ,तिला दिला,  मीही घेतला .

९ वाजता पोहे भिजवले ,कांदा चिरून घेतला मिरच्यांचे तुकडे करून घेतले ,खोबरे किसून घेतले  कोथिंबीर बारीक करून घेतली , मस्त फोडणीचे पोहे केले , लिंबू पिळून तिला दिले ,मीही घेतले ..

११ वाजता कुकर लावला , गवारीच्या शेंगांची दाण्याचा कूट लावून भाजी केली , वरणाला फोडणी  दिली , गोल म्हणता येतील इतपत गोल पोळ्या केल्या . काकडीची कोशिंबीर केली . दाणे कांद्याची ओली चटणी केली .
बरोबर १ वाजता  दोघांनी  जेवण केले . टेबल आवरून ठेवले .

४ वाजता पुन्हा चहा केला , तिला दिला मीही घेतला .

संध्याकाळी डाळ तांदुळाची फोडणीची खिचडी केली , ताकाला आले,कोथिंबीर साखर घालून मठ्ठा केला , ९ वाजता दोघेही जेवलो .

सर्व आवरा आवर करून ,
बेडरूम मध्ये
आलो तर...

मॅडम ढसाढसा रडत होत्या . ....

काय झाले म्हणून विचारले तर ?

म्हणाल्या
"  तुमचे माझ्या वाचून काहीच अडत नाही तर, माझ्या समाधाना साठी तरी कमीत कमी

हे कसे करू? 
ते कसे करू ?
एव्हडे तरी विचारायचे होते "

आत्ता बोंबला😉

😜🤪😝😂😛🤣😛😛😛

No comments:

Featured Post

नाव

Popular Posts