Sunday, April 19, 2020

मेहुणी



दाजी, जीजूशब्दांची सुखद ओळख, 
करुन देते मेहुणी
नेहमीच आपल्या घरी हवीशी वाटणारी, 
अशी एक पाहुणी

जात्याच ओळख असते ईथे, 
नसते कुठली फाॅरमॅलिटी
पहिल्याच भेटीत आपलं मानते, 
अशी एक पर्सनालिटी

लग्नाची हळद असो, 
वा असो होळी
मेव्हणी असते जिवनातली, 
चविष्ट साजुक पोळी

मेव्हणी असते  फक्त 
गोड आठवणी
चेष्टा-मस्करी, गुजगोष्टींची, 
आंनदी पाठवणी

या नात्यात असे एक गोडवा, 
इंद्रधनुतला रंग असे सातवा
नसला तर कळत नाही, 
असला तर मन भरत नाही.

बायको माझी सग्ळयांत प्यारी, 
पण कविता राहील अपुरी
नाही लिहीलं मी जर खाली, 
बायकोपेक्षा मेहुणी बरी 😜😜

  • दत्ता चत्तर

No comments:

Featured Post

नाव

Popular Posts