काय हवे आहे तुला,
मनाला विचारुन बघ
एकदा ठरलं त्याचं कि मग
त्यालाच ते रोज सांगुन बघ
आकर्षणाचा नियम आहे,
जे हवं ते मिळेल तुला
फक्त रोज दिवसा ढवळ्या
बघत रहा ध्येयाला
तू आहेस तुझे विचार,
नाही तुझा आकार
बदलायचे असेल तुला तर
बदल आधी विचार
मनांत आणलेस सदैव तर
होईलही विकार
म्हणून म्हणतो चांगले चित,
चिंतू नकोस भिकार
सल असेल कुठलाही वा
असेल काही आजार
विचार करून त्याचाच सारखा
दुनिया झाली बेजार
काय हे ध्येय अन्
कसला हा बाजार
वाटते एक घाव दोन तुकडे,
करावा एकच प्रहार
~दत्ता चत्तर
No comments:
Post a Comment