Sunday, July 19, 2020

धोपट वाट

मागे तुला ओढताना
खेकड्यांची गर्दी झाली
जातीचेया भेकडांनी
फोडताना गै केली

पाठी तुझ्या बोलताना
खरे खोटे बोध नाही
चामागिरविताना
बाराखडी न्यून झाली

कर्तुत्व तुझे खुजे करण्या 
खोटेच केले विजयस्तंभ
उंची तुझी खोडताना
बेगडीच रेषा लांब

जगाचीही रीत असे
घर फिरे फिरे वासा
एकी पाहून तयांची
सर्प मुंगुस खेळहा

लढत र्हा कर्णापरी
नकोत हे गटतट
नको खुजांचा हा संग
धोपट ही तुझी वाट

करी शक्तिचे ईमले
जिंकण्या ते लढाईत
सोडू नको सत्यव्रत
युद्धी तुच सराईत

तुला हरविण्यासाठी
करती ते आटापिटा
टाक्याच्या घावाविना
दगड मुके देवपणा

  • दत्ता चत्तर

No comments:

Featured Post

नाव

Popular Posts