प्रेमाचे पाश तु
भोवती बांधले
दावीले सुस्वप्न
लक्ष्य तू वेधले
आठवणींचे मोती
तुझविणा ते सांडले
कसे कळेना सख्यारे
मी प्रेमरंगी रंगले
तू असे सोबती तर
स्वर्गसुंदर जग भासले
तुझ्यासवे जगण्यापरी
हसत दुःख मी भोगले
घर तुझे देवापरी
फिकी त्यापुढे राऊळे
ऐक माझ्या सख्यारे
मी प्रेमरंगी रंगले
वाट ही आसुसलेली
स्पर्शण्या तव पावले
तू येशील या आशेवर
नयन माझे होती ओले
सांगू कुणाला दुःख माझे
स्वप्न सारे भंगले
का कळेना मला मी
प्रेमरंगी रंगले
स्वर्ग दाविण्याचे स्वप्न
तु मला का दावले
आशांचे अगणित असे
गालिचे तु पेरले
सोडून तू गेलास मला अन्
आयुष्य माझे संपले
का कळेना मला मी
प्रेमरंगी रंगले
~दत्ता चत्तर
No comments:
Post a Comment