आईचा जोगवा । सांगावा मी कैसा
घ्यावा तिच्या जन्मा। तेव्हा कळे ।।
उडविला घोडा। तटाहून कैसा
बांधुनी लेकरा । पाठीवरी ।।
अनाथांचा करी। आनंदे सांभाळ
सिंधू सपकाळ । आई माझी ।।
पती सवे तिने । केला स्वार्थ त्याग
वसवले जग। आनंदवनी ।।
मराठी सम्राट। शिवाजी भोसले
वाढवी वत्सले। जिजाबाई ।।
रंजल्या गांजल्या। वाटे भरवसा
मदर टेरेसा । दुजी नाही ।।
आईचा पदर। सौभाग्य हे माझे
जिवन हे ओझे । आईवीणा ।।
~ दत्ता चत्तर
2 comments:
Khup chan
Mast...
Post a Comment