म्हणे शिवाजी कधी न केला भेद जातीधर्म
राजकारण्या का करतोसी मग हे दुष्टकर्म
नावे गावे घेती वाटुनी, सोडून राजधर्म
“एकमेका साह्य करु” तुका म्हणे हाच मर्म
जातीभोवती का विनतोसी काटेरी वस्र
अविचरानेत्या स्वकियांवर का चालवीशी शस्र
एकमेकां जीवे ऊठती, रंक आणि रावं
शपथ मावळ्या तुला असे हा माझा पराभवं
बाबासाहेब भारतमातेच्या घटनेतून बोले
“छुत-अछूत” नको भेद हा, तरी जय भीम केले
माझ्या नावे तरी तूम्ही का स्वग्रुही परतले
तव हट्टाने माझे ते श्रम वायाला गेले
तुमच्या हट्टापयी अमर हा झाला भेदभाव
शपथ अनुयाया तुला असे हा माझा पराभव
नको युद्ध ते म्हणुन मात्रुभुमी झाली दोन फांदी
या वादातून तारण्यापरी शहीद झाले गांधी
पित्याप्रमाणे राष्ट्रपित्याने केला सुविचारं
बंधुमध्दे राही आदर, जर असेल अंतरं
तरीही स्वकियांमधे असे का हा दुजाभावं
शपथ भारता तुला असे हा माझा पराभवं !!२!!
~ दत्ता चत्तर
No comments:
Post a Comment