देशावर आलेल्या संकटात आपण आपली काळजी घ्या, घराबाहेर पडू नका. ज्या गोष्टी करायच्यात त्या तुम्ही नंतर करू शकता. Game of Thrones मधे म्हटल्या प्रमाणे म्रुत्युला सांगा “Not today”
कवितेचं शिर्षक - जाल तोंड वासून
गावात तुमचं ‘नांव’ असेल
घर तुमचा ‘गांव’ असेल ।।२।।
गावातल्या ‘नांवा’साठी
घरातल्या गांवासाठी
तुम्ही रहा घरात बसून
नाहीतर जाल तोंड वासून
तुम्ही असाल निसर्गप्रेमी
वा असेल ओढ जीवघेणी ।।२।।
निसर्गाच्या प्रेमासाठी
जीवघेण्या ओढीसाठी
तुम्ही रहा घरात बसून
नाहीतर जाल तोंड वासून
कधी ऊगा हुसळती ‘किडे’
मी का ऐकु कुनाचे ‘ग’डे ।।२।।
हुसळणार्या किड्यांसाठी
‘ग’ वाल्या गड्यासाठी
तुम्ही रहा घरात बसून
नाहीतर जाल तोंड वासून
कुणी जोकर कट्यावरचा
एक्का हुकमी अड्यावरचा ।।२।।
कट्यावरच्या हसण्यासाठी
‘हुकुमा’च्या चुकण्यासाठी
तुम्ही रहा घरात बसून
नाहीतर जाल तोंड वासून
मदिरेचा ‘शौक’ पुराना
कुणी घेई तुझा उखाना ।।२।।
‘शोकसभा’ न भरण्यासाठी
ऐकण्या उखाना ओलांडून ‘साठी’
तुम्ही रहा घरात बसून
नाहीतर जाल तोंड वासून
गावी आला तुझ्या करोना
हात धुण्या हाच बहाना ।।२।।
करोनाला पुसण्यासाठी
हात विश्वासे घेण्यासाठी
तुम्ही रहा घरात बसून
नाहीतर जाल तोंड वासून
~ दत्तात्रय चत्तर
No comments:
Post a Comment