Saturday, April 11, 2020

सचिन

ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात पहिली कविता.. ज्या दिवशी भारताने बांग्लादेश इंडिपेंडंस कप मधे पाकिस्तानला हरवले त्या दिवशी बनवलेली...आज वही सापडली नाही पण परत आठवून लिहिली आहे. Enjoy 😉
सचिन
एके रात्री स्वप्नात
माझ्या आला सचिन,
म्हणे बॅटिंग तु कर,
मी चेंडू टाकीन.
पहिल्या चेंडूवरती त्याने
केले मला बीट्,
मनात म्हटले “आता जरा
पाहून खेळावे नीट्”.
दुसर्या चेंडूवरती मी
मारला असा शाॅट,
ग्राउंड बाहेर दिसली
ललना एक हाॅट
तिसर्या चेंडुवरती त्याने
केले मला बोल्ड,
सचिन म्हणतो कसा
“फोकस, आय टोल्ड”
अशी माझी इनिंक एका
ओव्हर मध्येच संपली
मी म्हटलं “सचिन, तु
बोलिंग टाकतोस चांगली”
पहीला चेंडू त्याने माझा
सीमेपार ठोकला
सीमेपार जाऊन देखील
झेल मी त्याचा टिपला
हे पाहून अंपायरने
घातली तोंडात बोटं
मी म्हटलं “अंपायर
बोलतो आहे खोटं”
दुसर्या चेंडुवरती मी
मारला असा डाय,
डोळे उघडून पाहतो तर मी
खाटेखाली हाय😜
- दत्तात्रय चत्तर

No comments:

Featured Post

नाव

Popular Posts