Saturday, April 11, 2020

खरी मजा बघण्यात असते

खुप गोष्टी करण्यापेक्षा, किंवा स्वत: अनुभवण्यापेक्षा बघण्यात जास्त मजा असते. म्हनतात ना, दुरुन डोंगर साजरे. मग अशीच एक कल्पना ह्या कवितेत साकारली आहे. Enjoy 😉
खरी मजा बघण्यात असते
तु झाली,
त्याआधीच मी झालो,
बघतां बघतां,
तु शाळेत नी मी काॅलेजात गेलो...
कधी दिसली नाहीस आधी,
का.......?
पाहील्यावर, रोजच प्रश्न पडला.
ऊत्तर शोधता शोधता,
तुझ्यावर जीव जडला...
रोज तुला बघुन सुद्धा,
मन कधी भरलंच नाही..
कसं विचारावं तुला,
माझं कधी ठरलंच नाही...
एके रात्री, स्वप्नात,
मी तुला विचारले..
होकार ऐकुन तुझा,
अंग माझे शहारले...
पुढे आपले लग्न झाले,
मुले झाली, आश्चर्य कसले..
नको लग्न म्हणनारे मात्र,
कुणी नाही भेटले...
तुही खुश आहेस पाहुन,
मी अजुन सुखावलो..
स्वर्ग हाच का म्हणुन,
आश्चर्यचकीत देखील झालो...
जीथं तु तीथं मी,
असं म्हणुन वर्षे सरली.
तुझ्या अपेक्षांचे ओझे वाहताना मात्र,
माझी चांगलीच जीरली...
वाईट स्वप्न असले तरी,
संपल्या शिवाय, उठवत नाही.
गोड शेवट करता करता,
रात्र मात्र पुरवत नाही...
रात्र संपली, स्वप्न विरले,
शिकवण तेवढी विरली नाही.
जी मजा बघण्यात असते,
ती मात्र जगण्यात नाही...😉
- दत्तात्रय चत्तर

No comments:

Featured Post

नाव

Popular Posts