Wednesday, July 22, 2020

‘चीन’पाट...

गर्वाने मिरवलं आजवर 
हिंदी चीनी भाई-भाई
चिन्यांना वाटलं,
त्यांच्या शिवाय पर्याय नाही,
आता वाटतयं मिरवायची 
झाली जरा घाई
ज्याला मानलं भाई
तो निघाला कसाई

चीनी ‘कम’ चहा सुद्धा
आरोग्यवर्धक असते
आणि जास्त चीनी झाली 
की चव घशात रुतुन बसते
मग ‘चहा’लाही जर असेल 
देशाचा अभिनान
तर मलाही नकोच आहे
ते भंगार चीनी सामान

म्हणे..चीनच्या वस्तू 
मिळतात खुप स्वस्तात
पण त्यामुळे भिकेला लागले 
आपल्या ईथले उस्ताद 
आपन घेतो, 
म्हणून चीन विकते
पण चीनच्या स्टीलपेक्षा, 
आपलं चीनपाट जास्त टिकते.

तुम्ही आजवर उपभोगली असतील
सामानं देशी, विदेशी
पण विसरुन चालणार नाही
गरीबाची देशी अन् गांधींची स्वदेशी
स्वदेशी सामानाची
घेऊ मजा छान
थोडेच दिवस मजा देणारं
काय कामाचं चीनी सामान

घरच्या अन्नापेक्षा
गोड शेण खाऊ नका, 
घर मेनाचं सोडून 
शेणामध्ये राहू नका
नाहीतर एके दिवशी 
येईल पारतंत्र्याचा पाऊस
अन शेणाचे घर मात्र 
जाईल त्यात वाहून

~ दत्ता चत्तर

1 comment:

Shashi said...

अप्रतिम...

Featured Post

नाव

Popular Posts